नातं तुझं माझं
नातं तुझं माझं
माझ्या भावनांचे डोह
तुझ्या मनात साचले
तुला आठवून पुन्हा
अश्रू डोळ्यात दाटले
तुझ्या हृदयाचे धागे
माझ्या हृदयाशी गुंतले
ठाव घेउनी काळजाचा
माझ्या मनाशी बांधले
सारे आता हे कसे
नवे वाटूच लागले
खरे असूनही सारे
भास वाटूच लागले
साऱ्या जुन्या आठवणी
पुन्हा उजळूनी आल्या
तुझ्यासवे माझ्याशीही
सारं बोलून त्या गेल्या
तू हसलीस गोड
माजे मनात काहूर
तुला पाहतो मी जेव्हा
भासे चंद्राचा तो नूर
तुझा हात येता हाती
सारे जग विसरतो
तुला आठवून मग
पाऊसही बरसतो
जुन्या त्या भेटीची
आज आठवण झाली
तुला पुन्हा आठवण्या
रात सरून ती गेली
तुझे माझे असे नाते
सारे सांगून ते जाते
तुझ्या माझ्या प्रेमामध्ये
वेडे न्हाऊन ते जाते

