नाती
नाती
नाती असती रे रक्ताची
जी आहे भगवंताची देण
काही जुळती प्रेमाची
निरपेक्ष गतजन्मीचं लेणं..
मानव जीवनात नाती
बने कठीण वाटेतील दुवा
ये हृदयीचे ते हृदयी बंध
जुळवून नक्की अनुभवा ..
किती निर्मळ निखळ
प्रेम देतात हे बंधन
सुख दुःखाच्या प्रसंगात
बनती सौख्याचे कोंदन..
भरवती कठीण प्रसंगी
ज्ञानामृत गोड वाणीने
झरा सकारात्मक विचारांचा
वाहे हृदयी शंभर पटीने
स्नेहबंध जुळले योगाने
याचा सुगंध निरंतर राहो
विठूरायाच्या कृपेने माझी
शब्दफुले हृदयात जावो..
