नाते प्रेमाचे
नाते प्रेमाचे
तुझे माझे नाते असे,
दूर असलो तरी जवळ भासे.
लहानाचे मोठे एकत्र झालो,
कधी भांडलो,कधी रुसलो.
नात्याचे बंध कायम जपलो.
घासातला घास एकमेकांना भरवला.
आवडीचा खावू नेहमी वाटून खाल्ला.
हसत खेळत कधी मोठे झालो नाही कळले.
नाते तुझे माझे कायम अखंड राहिले.
नको मला काही भेटवस्तू देवू.
नाही जमले भेटाया तर नको भेटू.
दूर असून ही भाऊ आपल नात जपू
