नाते जुळले तुझ्याशी
नाते जुळले तुझ्याशी
तू माझी प्रितसावली बनावे
तुझेच गीत मी गुणगुणावे,
दुःखी तू नसावे, सदा सुखाचे लाभो ते ओलावे...
मागणे हे असे देऊळाशी
तोडूनीया बंध...
नाते जुळले तुझ्याशी।।
तू माझीया सखे हृदयात लपावे
तुझेच नाव ओठी असावे
विरहाचे ना ग्रहण लागावे, तू शतदा प्रेम करावे,
लाजणे हे असे प्रितीशी,
बरसूनीया बेधुंद
नाते जुळले तुझ्याशी...!!
तू माझ्या काळजात असे रूतावे
तुझेच रुप नयनी बसावे,
नजरेत ना कुणी दिसावे, सप्तजन्म माझा तू असावे,
सांगणे हे असे श्वासांपाशी
उधळूनीया ऋतुरंग
नाते जुळले तुझ्याशी..।।