नाते गुरु शिष्याचे
नाते गुरु शिष्याचे
नाते गुरु शिष्याचे पवित्र पावन
लाभले आम्हाला परंपरागत आंगण
इतिहास मज सांगे हे नाते फार जुने
नाही काही मोल या समोर सगळे उणे
नाते गुरु शिष्याचे पवित्र पावन ।।धृ।।
द्रोणाचार्य एकलव्य याची काहणी
विख्यात जगाला शिष्याची भक्ती ही गुरुस्थानी
मानून पाषाण मुर्तीस गुरु तो घडला
क्षणात अंगठा कापून गुरु दक्षिणा देऊन इतिहास घडला
नाते गुरु शिष्याचे पवित्र पावन ।।१।।
काही तसेच घडले माझ्या बाबतीत
घडवले जीवन माझे जगण्या बाबतीत
पैसे अडका नव्हता बापा जवळ
येता जाता करे तो मला जवळ
नाते गुरु शिष्याचे पावित्र्य पावन ।।२।।
हुशार मुलांत होती माझी गणती
देशपांडे बाईची दृष्टी मला शोधती
शिकवण्यासाठी घरी रोज बोलावे
पैसा न घेता मला त्या धडे गिरवे
नाते गुरु शिष्याचे पवित्र पावन ।।३।।
दाडी मारता छडी चाले
वर्गात मला शिक्षा मिळे
लाड माझा आईवानी केला
गुरु होऊन मार्ग माझा घडवीला
नातं गुरु शिष्याचे पवित्र पावन ।।४।।
धन्य झालो गुरु-शिष्य परंपरेत आलो
बाई तुमच्या शिकवणीने खरे मी घडलो
कोटी कोटी नमन,शब्द पुष्प अर्पितो
कोटी कोटी नमन,शब्द पुष्प अर्पितो
नाते गुरु शिष्याचे पवित्र पावन ।।५।।
