नाताळ
नाताळ
नाताळ आहे माझा
खूप आवडता सण
येशूच्या जन्माचा
हाच आनंदी क्षण
नाताळसाठी बनवू
ख्रिसमस ट्री छान
जिंगलबेल जिंगलबेल
गाऊया मस्त गाणं
रात्रीच्या वेळी जेंव्हा
रमून जाईन स्वप्नी
नाताळबाबा आणेल
खूप सारी खेळणी
डोक्यावर लाल टोपी
दाढी शोभे पांढरी
नाव दुजे सांताक्लाॅज
दोस्त आमचा भारी
सांताक्लाज ऐक ना
घरी माझ्या रे ये ना
रात्रीच्या वेळी मला
खूप खेळणी दे ना
मेरी ख्रिसमस म्हणत
देईन तुला मी शुभेच्छा
वाट तुझी पाहीन दोस्ता
पुर्ण कर ना माझी इच्छा!!