नात बाबांचे
नात बाबांचे
मुलीचा बाबा
बाबांच्या मुली!
बाबा ही तोच
मुली ही त्याच!
नातं ही
एकच!
पण फरक
जमीन आसमानाचा!
बदलतात सर्व गणिते
मुलीचा बाबा म्हटल्यावर!
मुलीचा बाबा
समाज ओझ्या खाली!
'नकोशी' म्हणून
मुलींना झिडकारणारा!
बाबांच्या मुली म्हणाच
आनंदाने जोपासलेल्या!
कुठे ठेऊ कुठे नको करत
पहिली बेटी धनाची पेटी म्हणत फिरणारा!
प्रेमाने परी, लक्ष्मी म्हणूत
समाजात 'ती'ला मिरवणारा!!
बदलतात नाते
बाबांचे व मुलीचे
मुलींचा बाबा..ना
बाबांच्या मुली...आम्ही !!!
