STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Abstract

3  

Ramkrishna Nagargoje

Abstract

नारी आणि निसर्ग.

नारी आणि निसर्ग.

1 min
267

अशीच धुंद रात्र असावी,

निद्रा अशीच यावी,

प्रसन्न व्हावी तांबडफुटी,

रवी मित्रा संगे, व्हावी मैत्री माझी.


उंच डोंगरावरुन असेच पाणी यावे,

खळखळ अशीच व्हावी,

जल वाहवे निर्मळ,

सरिता तुझे अंगी.


ही रानफुले,आणि हे पशुपक्षी,

असेच उंच वृक्ष,आणि या लता,

वाघ सिंह हाती,असेच असावे वन,

पाहवी हरिणाची उडी,नाचता मोर,

हे अरंण्य घनदाट असावे.


अचळा भराव्या सा-या,

गाई,आई,आणि मादीच्या,

दुग्ध अमृते पान्हा पाजी,

आपुल्या बाळासाठी.


हे मेघ लागावे सारे,

जलमोती भरावे ढगामाजी,

ही वसुंधरा आपुली,

अशीच सजावी, हिरवा शालू तिचा,

वा-यावर उडावा, नसावे प्रदूषण,

हा सुर्य नित्य यावा, पुर्वेशी.


हे सुंदर विश्व असेच नटावे फुलावे,

नरास नारी असावी,बहुसूंदरी,

सुंदर व्हावे,नारीचे जगणे,

नारी निसर्गाचे देखणे,

बाळ पोटी वाहे,देते कळा प्रसुतीच्या.


हा पर्वत असाच असावा,

सागाराला लाट यावी,

भरती,ओहटी सारेच असावे,

हे निसर्गाचे देणे, सुगंध फुलात असावा,

कला ती असावी, मधमाशी अंगी,

मकरंद वेचावा, चाखावे बोट,नित्य नवे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract