Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

नाळ तुझी माझी

नाळ तुझी माझी

1 min
163


नाळ तुझी मला , असे जोडलेली

चाहूल येताच , मी सुखावलेली(1)


हालचाल तुझी , जाणवे मजला

हळूच रे बाळा , कसे सांगू तुला?(2)


गप्पा किती मारी , मी तुजसंगती

हुंकार देऊनी , औत्सुक्ये ऐकसी (3)


पौष्टिक पदार्थ , नाळेने दिधले

गाठ तुझी माझी , नातेच सांधले(4)


जन्म दिला तुज , वाढविले प्रेमे

नाळेचे बंधन , घट्ट गोफ झाले (5)


शिक्षण होताच , कर्तृत्व बहरा

कृतज्ञ नाळेला , चेहरा मोहरा (6)


क्षितीजे विस्तारी , पंख पसरुनी

मागे न पहासी , मान वळवूनी (7)


हळूहळू सारे , इथले धूसर

वेळ नसे तुज , सदा कार्यभार (8)


मोठा होता होता , लांबच गेलासी

पैलतीर मज , जवळ आलासी (9)


नाळेचे बंधन, आता वाटे तुटे

सुखी असो बाळ , माय मुखावाटे  (10)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract