मुलीच्या जन्माचे स्वागत...
मुलीच्या जन्माचे स्वागत...
कोंब तो उमलला गर्भात
मुलगा असो किंवा मुलगी
दोन्ही ती आईचीच लेकरे
घरट्यात खेळतील छान
जशी चिवचिवती पाखरे
मुलीच्या जन्माचेही स्वागत
मुलगा आहे वंशाचा दिवा
मुलगी ही वंशाची पणती
जन्म होता घरात कन्येचा
लेकीची ओवाळूया आरती
इवलीशी छान परीराणी
व्हावी लेक माझी खूप मोठी
घ्यावी मुलीने नवी भरारी
आकाश पादाक्रांत करावे
असावा बाणा तिचा करारी