STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

मुलीचं लग्न

मुलीचं लग्न

1 min
995


मुलगी वयात आली

की हर एक बाप 

पडतो काळजीत

तिच्या प्रत्येक 


पावलागणिक

पाहत असतो

ती कुठं आहे जात ?

बाहेरची स्थिती 


बापाला झोपू देत नाही

अगदी स्वस्थपणे

जेवू ही देत नाही

कधी पोट भरून


पेपरातल्या बातम्याने

काळीज धस्स करते

मुलगी जेंव्हा बराच वेळ

घराबाहेर असते


लग्न करून एकदाचे

दोनाचे चार हात केले

की जबाबदारी संपते

एक बाप म्हणून


त्यासाठीच तर करतो

खटाटोप तिच्या लग्नाची

मुलगी त्याला ओझं नसते

पण एक जबाबदारी


एक कर्तव्य म्हणून

जेंव्हा विचार करतो

तेंव्हा त्याचं काळीज

त्याला खायला होतं


लोकांना काय कळतं

ते मुलींना डोक्याचं ओझं

परक्या घरची देणं 

अशी उपाधी लावतात


पण बाप कधी तिला

तसं समजतच नाही

त्याच्या काळजाचे वेध

कुणालाच कळत नाहीत

मुलीचे लग्न होईपर्यंत.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational