STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

मुखवट्यांचे जग

मुखवट्यांचे जग

1 min
221

मुखवट्यांचे जग इथले

वागणे सदा नकली

हसणे इथले फसवे

दुःखही ना हृदयस्पर्शी (1)


भीकेसाठी पुढे करिती

मुले दुसऱ्यांचीच

कशी दयाबुद्धी यावी?

फसवणूक सत्याचीच (2)


श्रीमंतीही खोटी इथली

खोटा मांडिती देखावा

का हव्यास एवढा

श्रीमंतीचा हवा ?   (3)


कुड्या हि-यांच्या असूनही

रांगेत गरीबांच्या

येती गाडीमधूनी

घेण्यास वस्तू गरजूंच्या  (4)


असली नकली फसवे

का मुखवटे घालावे?

जसे आपण आहोत तसे

का न कुणी ओळखावे? (5)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract