मतदानाचे महत्त्व
मतदानाचे महत्त्व
म - मतदान माझे, माझ्या देशासाठी,
त - तयाला प्रगती पथावर नेण्यासाठी,
दा - दानातील श्रेष्ठ असे हे मतदान,
ना - ना जाणिव कोणा, तरी निभावा कर्तव्य,
चे - चेहऱ्याचे सरकार असू दे कोणाचेही,
म - मनी करुन निर्धार,योग्य मतावर मार शिक्का,
ह - हरणे, जिंकणे,सत्तेत येणे नाही तुझ्या हाती,
त्त्व - तरी कर्तव्यदक्ष बनून शाई लाव बोटी,
जा - जागृती होता मनात, प्रगती होईल देशात
ण - नवविकासाच्या संधी मतदानाने होई निर्माण !!