मतदान
मतदान
झाल्या असेल किती चूका
माफ करूनी मतदान करा
राष्ट्रासाठीचे कर्तव्य बजावूनी
चांगल्या नेत्याची निवड करा....!!
निवडणुकीचं वारं फिरलय
आश्वासनाचे महापूर आले
काका काकू मामा मावशी
आजी आजोबा नाते मिळाले.....!!
प्रजेचे स्वप्नं पुर्ण करण्या
पाच वर्षे ही कमी पडतसे
करूनी सहकार्य त्यांना
तीच देशाला सुदृढ करितसे.....!!
सारेच नेते भ्रष्ट नसतात
काही राष्ट्रहितांसाठी ही लढती
राजनीती काळाची गरज आहे
देशासाठी छातीवर गोळ्याही झेलती....!!
मतदार राजाची भूमिका मोठी
मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य करा
जनहिताला रक्षण्यासाठी
हक्क गाजविण्या सिद्ध ठरा....!!
पुढे यावे युवा तरून वर्गाने
वसा घ्यावा कर्तव्याचा
भारता व्हावा महासत्ता
ध्यास असावा उंच भरारीचा.....!!
