STORYMIRROR

Sanjay Pande

Inspirational

3  

Sanjay Pande

Inspirational

मताचा हक्क

मताचा हक्क

1 min
713



पाच वर्षात एकदाच

असतो मताचा हक्क

मतदान करायचच हे

ठरवून टाका आता पक्क।।


ठरलेले असेल लग्न

तरी ही आधी मतदान

हाच आमचा निर्णय

नंतर करू कन्यादान।।


सुट्टी आहे म्हणून भ्रमण

करायला हरकत नाही

मतदानाचा हक्क बजावून

आनंदाने करा सर्व काही।।


उन्हाचा तडाखा बसेल

म्हणून काय असे घाबरता

मतदान हे प्रथम कर्तव्य

हे का बरे सर्व विसरता।।


कोणतेही असो आम्हा काम

सारे काम ठेऊ आता मागे

सर्वानी मतदान करावे म्हणून

सर्वाना आता करू या जागे।।


मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्यात

या सारे उत्साहाने भाग घेऊ

भारतीय संविधानाची पताका

चला उंचच उंच आपण नेऊ।।


शंभर टक्के मतदान

हाच आम्हा सर्वांचा नारा

मतदान हेच आद्य कर्तव्य

मानतो भारत देश हा सारा।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational