Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Inspirational

4  

Chandan Pawar

Inspirational

मृत्युंजय..

मृत्युंजय..

1 min
219


शिवबास संस्कारून चेतवली 

ज्योत हिंदवी स्वराज्याची ;

शब्दही पडतील थिटे 

 थोरवी वर्णाया शिवछत्रपतींची .


जिजाऊ शहाजीच्या शिवबाने 

स्वराज्याचे तोरण बांधले ;

 फितुरांच्या फितूरीला

 तलवारीने शिरच्छेद केले .


भूगोल समृद्ध किल्ल्यांनी तर

इतिहास शिवपराक्रमाने साकार झाला;

 सुलतानशाही उलथवून शिवबा

 प्रजेचा तारणहार झाला .


तळहातावर मरण पेलण्याचा 

वारसा सकलांना दिला ;

शिवबा "मृत्युंजय "होऊनी 

इतिहासी अमर झाला .


चंद्र- सूर्यही झुकले

मुजरा करण्या शिवरायांस ;

ऐसा प्रतिपालक जाणता राजा 

पुन्हा न मिळणे या जगास.


देह झिजवला रयतेसाठी

 शिवबाने बनुन "चंदन" ;

शिवगुण- शिवविचारांना 

आमचे त्रिवार वंदन.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational