मृत्युंजय
मृत्युंजय
जप मृत्युंजयाचा
देई अमर मंत्र
मुक्त होई अमरत्व
ना टळे मृत्यू तंत्र
चिंतन करी हा जप
जीवन परिपूर्ण होई
मृत्युंजय नामात
वृत्ती पोषित होई
पूजन करता त्रिनेत्राचा
सुगंधित करे जीवन
सत्कर्म देई शक्ती
स्वच्छ निर्मळ मन
ध्यान लावे जीवनात
उच्चारूनी मृत्युंजय जाप
शुद्ध आचरण ठेवत
टाळू या करण्यास पाप
