STORYMIRROR

BABAJI HULE

Abstract

3  

BABAJI HULE

Abstract

मृगाचा पाऊस

मृगाचा पाऊस

1 min
302

उष्णतेच्या दाहाने पाठ सोलटली सृष्टीची 

वाट पाहतो नभीच्या पाऊस धारांची 

ग्रीष्माच्या तडाख्याने धगधगली धरणीमाता 

मृगाच्या पावसानी कधी होईल शीतलता  II

 

बळीराजाची तयारी झाली काळ्या आईच्या मशागतीची 

नांगरणी, कुळवणी आणि बीजे सजविली पुढील हंगामाची 

काळ्याकुट्ट ढगांची मैफिल रंगली निळ्या आकाशात 

वळिवाच्या हजेरीने अभिषेक झाला शेतातल्या ढेकळांत  II

 

चाहूल लागली थंड वाऱ्याची आणि धारेची सरला हा उन्हाळा 

बरसती जलधारा आणि सजला मृगाचा नयनरम्य सोहळा 

मातीलाही गंध सुटला, भुलविली सारी सृष्टी              

बहरली झाडे वेली, केली मृगाने पुष्प वृष्टी   II         

 

 

काळी आई पोटात बाळसे धरू लागली 

कोवळ्या कोबांना जन्माला घालू लागली 

झाला प्रेम वर्षाव आणि हिरव्यागार शालूने धरती नटली 

तरारली बीजांकुरे मातीतुनी आकाशाकडे झेपावली  II

 

पावसाचा पहिला मुलगा, मृग पृथ्वीला बिलगला 

थरथरणाऱ्या धरणीच्या कुशीत जाऊन विसावला 

बरसणाऱ्या मृग धारांनी धरणीमाता शांत झाली 

कवितेच्या धुमाऱ्यांनी माझ्यातल्या कवीमनाला पालवी फुटली  II


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract