मृद्गंध
मृद्गंध
छेडीत राग मल्हार आज
आल्या कुठुन या ओल्या सरी
बरसला तो श्यामल मेघ
मृद्गंधित मन तुजसवे चिंब न्हाले...
मोहिनी मनी ही घालती फुलपाखरे
येती कुठून हे स्वर बासरीचे कानी
आतुर हे ओठ थेंब अलगद झेलाया
जणू मिलना आतुर धरा ही नभीच्या
पुलकीत रोम रोम मन मोरपीसी
कांती नवचैतन्य लेऊनी जणू
लाजे गाली ही गंधित धरती..
असा गायीला तू प्रेमळ राग
झोंबतो हा गारवा मना
वेडावते ही प्रिती धरा पुन्हा
जागते प्रिया मनी हर्ष उल्हास ही
गंधाळतो मृद्गंध पहिला वहिला