सांग जगू कशी?
सांग जगू कशी?
कातर वेळी भाव अनामिक, ओढ जिव्हरी लागलीअशी,
मनी उमगले ते फोल ठरले, भान अनावर सावरु कशी?
आज कळली छबी कोणाची ,ओळखी कोणास पटेनाशी
नात सांगुनी फास गळाभर, सर मोतीयांची लेवू कशी?
श्रावणातली सर पावसाळी, ओंजळीत दव कोरड फशी
जीव आतुर मन मोकळ, उनाड वाऱ्यासवे वाहू सुरक्षित?
क्षणात आपले क्षणात परके ,आब नात्यांचा राखूनही
भास मनी गुज पाखरांच ,भाव जनी ते सांगू कशी ?

