सर पावसाळी...
सर पावसाळी...
जरा विसा बरसत जा ,
हळुवार क्षणाच कोंदणत
भाव अनामिक जपत जा
कधी मधी सरसर सरसरी
आठवणीचा तलाव ओसंडून
काठावरचा गाव सोडून वाहत जा
जरा विसा बरसत जा ,
हळुवार क्षणाच कोंदणत
भाव अनामिक जपत जा
कुठुन वी ति सर श्रावणी
भाळीच कुंकू जातं भिजूनी
जरा विसावून चिंब भिजत जा
सुखद क्षण एक जपत जा
जरा विसा बरसत जा ,
हळुवार क्षणाच कोंदणत
भाव अनामिक जपत जा
ओलेचिंब रानकेवडी फुल,
मनाजोगतं बहरून येईल
भास क्षणभर खेळ करतील
भान राखून चिंब भिजत जा...
जरा विसा बरसत जा ,
हळुवार क्षणाच कोंदणात
भाव अनामिक जपत जा...

