आप्त
आप्त
क्षणात सार जग बदलून गेली
नकळत सार भान हरपून गेली
भाव अनामिक साद ति एकल
जगात साऱ्या मज दुखावून गेली
कोण कुणाचे सारे क्षणभराचे
आप्त परिवार सारे घेऊन गेली
सर पावसाळी ओली धरा अन
ओढा धरणं भरून वाहून गेली
आज रुद्र अवतार घेऊन ति
नदी ही भान विसरून गेली
आता कुठे स्थिरावले तोवर
जगात एकली मज सोडून गेली...
अशक्य सुंदर गझल म्हणून परी
सर पावसात चिंब भिजून गेली
नभास ओंजळीत घेऊ म्हणणारी
मने सारी पुरा ने विस्कटून गेली...
