मृदगंध
मृदगंध
आला मृगाचा पहिला पाऊस
वैशाख वणवा झाला शांत
मनोमन आनंदी झाले समस्त
सजीव भूतलावरचे...
येता पावसाच्या सरी
दवबिंदू पानापानांवर दिसले
धरणीमातेच्या मृदगंधाने
परिसर दरवळला......
लागली पावसाळ्याची चाहूल
शोधाशोध सुरू झाली छत्रीची
पण मनात होते घ्यावा आनंद
भिजून ओलेचिंब पहिल्या सरीत.....
इंद्रधनुष्याचा आनंदासह
धरणीच्या हिरवळीची सोबत
पशूपक्ष्यांचे आनंदाने किलबिलणे
वाटे जणू स्वर्ग अवतरला भूवर...
आठवणीत राहतील कायम
पहिल्या पावसाच्या हरी
श्वास आहे हृदयात अन्
आयुष्य आहे तोवरी
