मृद्गंध पावसाचा
मृद्गंध पावसाचा
चिंब सरी अंगावर
गेला भिजवून धारा
कमी झाला तो उकाडा
मिळे सुख गार वारा
पावसाच्या सरीवर
चिंब झाले तन मन
आनंदात भिजलेले
मिळे सुख समाधान
पाऊस आला सोबती
वारा घेऊन आला
अन् गारव्याचा अलगद
स्पर्श अनुभवला
मेघाशी मैत्री होता नभी
दाटून येतो सरी वरसरी
कोसळून पुन्हा रिता होतो
अंबरी गर्जत धरणी मिळणा
येतो धरा गालात हसता
प्रेमात तिच्या फसतो मृद
गंधा सवे स्वप्न माती
फुलवितो तिच्या गर्भातून
कोंब फुटता सुखावतो
अवचित येऊन वसुंधरेला
आनंद देतो
पाऊस मंद धुंद
गंध सुगंध स्पर्श
आनंद परमानंद सारे
चिंब चिंब सरींनी धरा
ती ही न्हाऊन निघाली
मृद्गंध पसरत गेली
मृद्गंध मनात मन धुंद
धुंद झाले
