मराठमोळी नाळ
मराठमोळी नाळ
नाळ जुळते माते शी
अन नाते रक्ताचे जोडते
बाळ मोठे होते तेव्हा
माउलीस हर्ष होते..
मराळमोळी मायबोली आमची
जन्मापासुन नाळ जुळते
थोडच मोठ झाल्यावर
का त्यांना लाज वाटते?
आपली माय आपलीच भाषा
दोघांना ही दुर सारते
अश्रृंच्या दोघांनाही
का आता किंमत नसते..
जन्म देणारी माउली
वृध्दाश्रमात दिसते...
अन मायबोली मराठी माझी
फक्त लहानपणीच ओठांवर येते...
अन खोट्या स्टेटस साठी
संस्कारांची होळी होते....
नकोरे वागु वेड्या असले
त्यास माये ने तुज घडवले
तुझ्य स्टेटस मिळायाला त्याच
मायेचे पाय झीजले..
दुख तुला झाल्यावर
त्या माउलीला ही अश्रृ दाटते..
कारण तुझ्यासोबत त्या मायेची
नाळ जुळलेली असते
नाळ जुळलेली असते....
