प्रश्नचिन्ह!
प्रश्नचिन्ह!
#lovelanguage
सांगव का नाही
मनातल बोलाव का नाही
कळतच नाही?
कुणाला तरी गमवण्याची भीती
कुणालातरी दुखवण्याची भीती
कुणाचा चा तरी नकार ऐकण्याची भीती
का कुणास ठावुक मन ऐकतच नाही
सांगाव का नाही
बोलाव का नाही
काही कळतच नाही?
कुणी रागावेल का आपल्यावर?
कुणी चुकीच समजेल का ?
कुणाच्यातरी मनात प्रतिमा आपलि बिघडेल का?
कुणाच्या तरी आयुष्यात
आपल्यामुळे तणाव वाढेल का?
कशाला देवाने मन दीले!
कशाला प्रेम करणारे ऱ्हुदय दीले!
एकाचे धडधडते तर त्याच्यामुळे दुसर्याचे दुखावते
का आपलेच मन आपले ऐकत नाही
सांगावे का नाही बोलावे का नाही
कळतच नाही?
असंख्य अशा प्रश्नांनी मन बैचेन का होते?
त्यांच्याच विचारात नेहमी का अडकते?
त्यांना आपल्या भावना का कळत नाही?
अशा प्रश्नचिन्हाने मलाच ग्रासले
काही कळतच नाही.....

