प्रेम
प्रेम
प्रेम एक अप्रतिम भावना
प्रेम एक सुंदर मनाला लाजवणारी कल्पना
कोसो दुर बसुन कोणी आपला विचार करतय
कोणी मनातुन आपल्याला निरंतर आठवतय
हे कळताच मनात अद्भुत आनंद देणारी चेतना
म्हणजे प्रेम..
प्रेम कोणाच्यातरी विचारात सातत्याने वहावत जाणे
आपला पण तो विचार करतय का
ह्या कल्पनेनेच भारावुन जाणे व
अंतरंगातुन एक भास होणे..
कायम त्याच चित्र नयना समोर येणे
आपल्या आवडत्या व्यक्तीच चित्र नयनात साठवणे
म्हणजे प्रेम
कोणवर तरी हक्क असल्याचा आनंद मिऴने
कुणासाठी तरी वाट बघायची वेळ येणे
ह्रुदयात एक सुंदर अद्भुती जाणवणे
आणी आपसुकच डोळे बंद केल्यावरही तोच व्यक्ती दीसणे
म्हणजे प्रेम..
प्रेम करणार्यांनी प्रत्यक्षात भेटुनच प्रेम करावे
हा नियम नसतो
हे कळुननही एकमेकांवर प्रेम करणे म्हणजे
प्रेम
प्रेमाला ना दीशा असते ना रस्ते
प्रेमाला ना काळ लागत ना वेळ
प्रेम होणे म्हणजे प्रभुने दीलेली सुंदर गोष्ट
प्रेमाची अनुभुती ही ईश्वरानी दीलेली अप्रतिम भेटच
प्रेमात पडलेल्याला सर्व काहीलमाफ असते
अस म्हणतात ते प्रेमात पडल्यानंतरच समजते
ते म्हणजे प्रेम..

