मराठी भाषा सुंदर आहे कारण...
मराठी भाषा सुंदर आहे कारण...
महाराष्ट्राची शान मराठी...
शिवाजी महाराजांची आन मराठी
ह्रदया ह्रदयात स्थान मराठी
इतिहासाचे पान मराठी
महाराष्ट्राची शान मराठी
योगींंचे ही ध्यान मराठी
आपुलकीची भाषा मराठी
प्रत्येकाचे स्वप्न मराठी
महाराष्ट्राची शान मराठी
बुुुवांचे किर्तन मराठी
धड्यांचे व्याकरण मराठी
प्रत्येकांची जान मराठी
महाराष्ट्राची शान मराठी
तलवारीची म्यान मराठी
तमाशा, लावणी, मनोरंजन मराठी
प्रत्येकाचा अभिमान मराठी
