STORYMIRROR

Ganesh Punde

Inspirational

3  

Ganesh Punde

Inspirational

मराठी बाणा

मराठी बाणा

1 min
362

काही करू नका तुम्ही जाणा

आता जागवा मराठी बाणा


ही शुराची शुराची मर्दानी जात

का बसली हो बसली दात खात

असा करू नका डोळा काना

आता जागवा मराठी बाणा


का करता हो करता राजकारण

मरतो शेतकरी करा हो त्यांच तारण

भटकू नका असे रानावना

आता जागवा मराठी बाणा


मावळा लढला हो लढला मातीसाठी

तुम्ही लढता हो जाती धर्मासाठी

तुम्ही देशाचं भविष्य जाणा

आता जागवा मराठी बाणा


काय कमी हो कमी होत देशात

तरी बदल बदल झाले भाषेत

भरून टाका आता ह्या उणिवा

आता जागवा मराठी बाणा


आपली माती ही महाराष्ट्राची माती

आहे जगभर जगभर ज्यांची ख्याती

आम्ही मानतो तुम्ही ही माना

आता जागवा मराठी बाणा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational