STORYMIRROR

Dhananjay Deshmukh

Abstract Others

4  

Dhananjay Deshmukh

Abstract Others

मोकळी हवा

मोकळी हवा

1 min
1.0K

आकाशही इथे बंदिस्त झाले

हवेसही नाही कुठे मोकळीकता

झाले जंगल विराण इथले सारे

कृत्रिम वार्‍याची केली इथे आगळीकता...


दारे बंद झाली सवे खिडक्याही झाकल्या

माणसांची इथल्या मनेही त्यात जखडून गेली

नाही उसंत श्‍वास घेण्या इथल्या हवेलाही

जंगलात या सिमेंटच्या ती हवाही गुदमरू लागली...


मिळते हवा आजही इथे कधीतरी

घेऊन धुराचे लोळ नि मातीचे कल्लोळ

घटले प्रमाण शुद्धतेचे तिच्यातले

असंख्य विषाणूंचे त्यात दाटले मोहोळ...


नाही इथे अजूनही कुणास जाण

निसर्गाचा अनमोल ठेवा देण्याची

समजही नाही कुणास इथे आज

करून गैरवर्तन रोगास आमंत्रित करण्याची...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract