मोहरा
मोहरा
शोधणे नामशेष झाले
जिवंत गाडले गेले
पल्लवित झालेल्या आशा
पदरी पडल्या निराशा
अनुभव चढवी पायऱ्या
गोष्टी शिकवे न्याऱ्या
स्वानुभव गेला सांगून
स्वभाव तोला सांभाळून
नुसतीच वेदना नाही
कसली संवेदना पाही
गहरा आतला आवाज
मोहरा बनला आज
उदयास मोहरुन जाई
श्वासात परतून येई
