मोहमाया
मोहमाया
अहा रे कोरोना तुझी अपार ही मोहमाया
तुझ्या सावलीने हलवला सार्या जगाचा पाया
अजब रूप तुझे दाखवसी नाना कळा
तुझ्या विचाराने नुसत्या पोटात येतोय गोळा
लाॅकडाऊनचा केला इशारा थाबंले जग सारे
महामारीच्या दानवाने पसरवले भितीचे वारे
रस्ते झाले मोकळे सारे शुकशुकाट पसरला
प्रत्येकाने संसार आपला मर्यादांनी सावरला
सगळे झाले निवांत घरी पण बाहेर पडता येइना
स्वच्छ हातात कोणाचा हात ही घेता येइना
मास्कचे गारूड चेहर्यावर झाकले जाऊ लागले
मंदिरातले देवही चार भिंतीआड जगू लागले
