Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Fantasy Others

1  

Prashant Shinde

Fantasy Others

मोदक ..!

मोदक ..!

1 min
2.9K


गणपतीचे आगमन होताच

तांदळाच पीठ घरी येतं

आणि त्या पाठोपाठ खोबरं

खसखस गूळ सारे हजर होतात


कुकर स्वच्छ होतो

उकड निघते आणि मग

मोदकाचा घाट मार्गी लागतो

सारणाची तयारी झाली की आई सुटले म्हणते


खरं सांगू ते पहाटे पहाटे

तिचं तयार होणं, आवरणं

सारी लगबग आणि ती पण

सर्वत्र लक्ष ठेऊन होत असते


विड्याची पानं, सुपारी, चिल्लर

तांदूळ, अक्षता, दुर्वा, आगाडा, फुल, केळी,

पंचखाद्य सारं तोंडपाठ, भर भर झांझासह

आरती पुस्तकाला घेऊन उजळणी होते


तोवर उकड काढून मळून चांगली पारी

मना प्रमाणे हातावर तयार होते

गोड सारण पोटात टुंम भरलं की

उकडीला कुकर मध्ये जाऊन बसते


तोवर पूजा विधी आटपतोच

इतक्यात गणरायालाही मोदकाचा

छान खमंग वास भावतो

आणि प्रसन्न चित्ताने तो आरतीला हजर होतो


सुखकर्ता पासून सुरु होणारी

आरती मंगलमूर्ती मोरया म्हणून संपते

मंत्राक्षता मंगलाष्टक झालं की

हळूच गणपती मोदक हातावर देतो


खरं सांगू मी मोदक हातावर

येई पर्यंत कधी डोळे उघडत नाही

त्यामुळे गणपती बाप्पाच

प्रसाद देतो ही भावना टिकून आहे


मोदकाची अवीट गोडी

अजूनही तशीच टिकून आहे

म्हणून तर गणपती बाप्पा

सदैव मोदकासाठीच प्रसन्न चित्ताने घरी येत आहे


म्हणून सांगावे वाटते मला

मोदक करावेत सुबक सुंदर चविष्ट

माफक प्रमाणात वापरून गोड गुळ

ज्याने प्रसन्न होतो गणेश, हे कृपेचे मूळ......!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy