मनखुशी
मनखुशी
व्यस्त असते सदा
मनखुशीत मीच माझ्या,
क्षणोक्षणी जगते अशी
स्वप्नात मीच माझ्या
करतात नकळत वार
भावनांना छेडतात माझ्या,
मनावर न घेता तिळमात्र
मनखुशीत जगते मीच माझ्या
आत्मविश्वास भरूनी अंतरी
आकाशास गवसणी घालिते,
स्वप्नांच्या परिघातूनी सहज
क्षितिजापलिकडे नजर टाकीते
मनखुशी माझी ईच्छामार्ग दावूनी
आत्मनिर्भर मज करितसे,
या जीवनाच्या वाटेवर
स्वानंदी क्षणास देतसे
मस्त राहावे सदा मनखुशीत
निंदनीय न मनी धरावे,
मोकळ्या श्वासात अगाध कर्तृत्व
सदा सळसळत राहावे...
