मनातील पाऊस
मनातील पाऊस
खूप दिवसांनी पाऊस पाहीला
तुमच्या माझ्या मनातला
रहाट गाडग्या मध्ये कुठेतरी हरवलेला
एका शांत दुपारी
अनुभवला त्याचा आवाज
मैफिलीतील सुरांना देऊन गेला मात
कोसळता कोसळता त्याने दिला ओलावा
निसटत जाणाऱ्या क्षणांचा
नी विसरलेल्या भावविश्वाचा
वाटलं असाच तो बरसात राहावा
आणि गतकाळाची दुवा साधला जावा
