मनातील गोडवा
मनातील गोडवा
स्वप्न हे साकारुनी,
प्रयत्न शर्थीचे करता,
आनंदाचे उधाण,
वानता कशाची राहता. १.
अट्टाहास, आग्रह
कठीण मार्गाच्या पूर्तीचा,
अविरत कष्ट ते,
स्वप्नवत त्या उद्दिष्टांचा. २.
तळहातीच्या रेषा,
प्राक्तनामधील भोगांचा,
नियतीचे विधान
खटाटोप बदलण्याचा. ३.
प्रगतीने, यशाने,
आलेख मग उंचावता,
कर्तृत्वाची ज्योत ही ,
कारकीर्द ही उजळता. ४.
