मनात भरलीस
मनात भरलीस
आज अचानक समोर तू दिसलीस,
नजरेत माझ्या कशी तू भीझलीस.
आठवण जरी तू मनात भरलीस, खर सांग तू मला विसरलीस.
नव्याच कुतूहल भलतच भारावलीस,
खोट्याचे खडे बोल उगीच का रडलीस.
सवयी नव्या उगाच का जडलीस, परत परत प्रेमात तू तर पडलीस.
उगीच गालातल्या गालात लाजलीस,
स्वच्छ आरश्यात पांढरी तूच उरलीस.
बघता बघता आपली ओळख पुसलीस,
पण तसूभर ही मागे ना फिरलीस.
आज पुन्हा नव्या वळणावर उभारलीस,
नव्या आशेची उमेद उधळलीस. जरी आधी कधी काळी तू हारलीस,
आज मात्र तू आणी तूच जिंकलीस.

