मनाचा दर्पण
मनाचा दर्पण
कधी सोडिशी तू , बंध हे मनीचे ,
कधी तोडीशी तू , निर्बंध हे जगीचे
तुझ्या चाल वाटा ,तुझ्या या कसोट्या ,
तरीही उभा तू ,न डगमगता थोडा
मनासारखे दुसरे ,दर्पण न मोठे,
तुझी सावली ना, तुझे रूप खोटे
तुझ्या या कुशीत, मी राहीन छोटा ,
सुखी राहीन , हा विश्वास मोठा
कसून निघालो ,या अग्नीतून आता,
झळाळेल सोने ,तूच माझा ज्ञाता
कुणी पाहणार , तुला तूच पाहे ,
तुझ्या आत कोणी, वेगळाच राहे
कसा तू स्वतःला, शब्दात तोले
मनाचा दर्पण , तुझे भाव खोले
उमजले तुला जे , ते कुणा न बोले ?
राहिले काही जे , कसे ओळखावे ?
जगाच्या न पाठी , स्वतः मागे धावे ,
उगा का सुखाला ,तू बाहेर पाहे ?
मिळेल तुला तू, जरा शांत राहे,
कुणी पाहणार, तुला तूच पाहे.
