STORYMIRROR

Bipin More

Abstract

2  

Bipin More

Abstract

मन

मन

1 min
42

उंचच उंच उदात्त आभाळासारखं

की भ्रष्ट आणि उथळ समुद्रासारखं

मनाचं लेणं जितकं कोरावं

तितकं ते गूढ सजीव अवघड


आतल्या आत समृद्ध चमत्कारी

प्रसंगी उत्त्कट उद्ध्वस्त अविचारी

डोंगर दरीच्या मूक झऱ्यासारखं

वेळ काळाशी जुंपलेल्या क्षणभंगुर वळीवाचं


भग्न राऊळाच्या जयघोषातलं

निश्चयी पोकळ खडकासारखं

बेदरकार वाऱ्याच्या आवेगात

विचारांच्या तुफानानं कणाकणात विखुरणार


भावनांच्या गोदामात काथ्याकूट करणार

अविवेकी नात्यांचे कासरे हाकणारं

स्वार्थाच्या शेकोटीची ऊब घेत घेत

जीवनाच्या चालीने अनुभवांची महाकाव्य रचणारं....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract