मन
मन
जागून काढते अशा
मी कित्येक रात्री
उद्याचा सूर्य उगवेल
देते मी मनाला खात्री
पुन्हा तोच चंद्र
पुन्हा तीच रात्र
रोजच सुरू असते
हे आठवणींचे सत्र
अंधारलेल्या या नभाला
चंद्रमा ची साथ आहे
चांदण्यांनी भरून सुधा
मन माझे रीतेच आहे
कित्येक रात्री आल्या
नि स्मृती ठेऊनी गेल्या
जडवलेल्या पापण्यांना
स्वप्ने देऊनी गेल्या