मन हे पाखरू
मन हे पाखरू
मन हे पाखरू पाखरू
तुला पाहता लागले बावरू
मुक्त आकाशी उंच भरारी घेऊ लागले
वेड्यापिशा या मनाचा तोल कसा आवरू
मन हे पाखरू पाखरू
तू समोर येता नयनांच्या
प्रीत मणी जागली
तू कटाक्षाने पाहता
नजरेची भूक भागली
तू बघ ना एक नजर मलाही
शृंगार आणिक किती करू
मन हे पाखरू पाखरू
तुझ्या होकाराने खुलली कळी
लाज दाटून आली ओल्या सांजवेळी
पाऊल माझे थबकले जागीच
पदर कसा सावरू
मन हे पाखरू पाखरू

