मला तुमचचं बाळ व्हायचयं...
मला तुमचचं बाळ व्हायचयं...
सांगा ना हो बाबा
आईवर का रूसलात
तिला सोडून एकटी
कुठे लपून बसलात
आठवतं का हो बाबा
स्वप्न माझी पाहायचात
माझं असणं दिसणं
त्याभोवती फिरायचात
प्रश्न तुमचे असे की
आई भांबावून जायची
होऊ नये तुम्ही दुःखी
जपता भंबेरी व्हायची
बोलताना तुमच्याशी
आई माझी फुलायची
काय वेळ आणलीत
फुल कोवळं झुरायची
बाबा माझं तरी ऐका
मला जगात यायचंय
आई सांग ना बाबांना
मला तुमचंच बाळ व्हायचंय
