मकरसंक्रांत
मकरसंक्रांत
संस्कृती भारतीय
नटली सणांनी
महाराष्ट्रीय
सण आला
तो काय
गोड
हो !
सूर्याचे संक्रमण
मकर राशीत
उत्तरायण
सुरू होते
सुदिन
आज
हा !
नववर्षाचा सण
मकर संक्रांत
सौभाग्य वाण
देती घेती
सवाष्ण
छान
तो !
पतंग बाजी खेळ
रंगतोच मस्त
बाल गोपाळ
आनंदाचा
हा मेळ
बघू
या !
देते मनापासून
तिळगुळ लाडू
गोड हासून
आनंदाने
बोलून
देते
हो !