मकरसंक्रांत
मकरसंक्रांत
येता सण मकर संक्रांतीचा
काहूर माजतो विचारांचा,
सुरू होतो हळूच गोंधळ
हृदयातील नाजूक इच्छांचा.
असतील जे जे निराश
त्यांना संक्रांत करते खुश,
मनातील दुरावे करुन दूर
वाईट गोष्टींचा करते चक्काचूर.
घेऊन मान तिळगुळाचे
आस्वाद देते ती आनंदाचे,
एक कण तिळगुळाचा
करतो काम देवाण-घेवाणीचे.
हाच सण मकर संक्रांतीचा
असतो खुपच समाधानाचा,
देत संदेश प्रेम नि गोडव्याचा
गंध पसरतो घट्ट नात्यांचा.
हर साल येते मकर संक्रांत
येताना आणते शुभ संदेश,
तो म्हणजे "तिळगुळ घ्या
गोड बोला अन् रहा खुश.
