मी
मी
माहित नव्हते कुठल्या गुंणत्यात हरवले होते
कागदा वर उतरला एक एक शब्द अन,
माझी मी मला पुन्हा सापडले
वेळच्या काटया सोबत मी फिरत होते
स्वत: साठी ही वेळ हवा,
हे लिहिता लिहिता समजले
अन माझी मी मला पुन्हा सापडले
आयुष्यात रंग तर ख़ुप आहेत
पण खास एक रंग आपला ही असतो
शब्दांची चित्रे काढता काढता,
माझे असे खास चित्र गवसले
अन माझी मी मला पुन्हा सापडले
सजून धजून आरशात बघताना,
एक नवीनच ओळखीचा चेहरा दिसला
करता करता कविता,नवे सुर जुळले
अन माझी मी मला पुन्हा सापडले
