STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

4  

Manisha Wandhare

Abstract Romance

मी तुझीच रे...

मी तुझीच रे...

1 min
306

साद घालते तुला ,

कधीची ऐकुनी घे ना ,

प्रेमात सापडले सुख मला ,

मी तुझीच रे मनमोहना ...

दुःख या वाटेवरती ,

सांगुन दुनिया थकली ना,

कशी समजावुनी सांगू मी ,

जळण्यातही सुख वाटते ना ...

डोळ्यांत पाणी नशीबी ,

प्रेमाला शाप तरीही ,

प्रेमाची सल बोचते,

सल प्रितीची किती गोड ही ...

डोळ्यांत तु मनात तु ,

तुझीच मी सावली ,

रात्रीत मिसळूनी तुझ्यात,

सांजेची उरते काहिली ...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract