STORYMIRROR

Shital Yadav

Drama Others

3  

Shital Yadav

Drama Others

मी तुझी अर्धांगिनी

मी तुझी अर्धांगिनी

1 min
14.5K


आयुष्याच्या पुस्तकातली एक कहाणी

तू सौभाग्य माझा, मी तुझी अर्धांगिनी


माहेर माझे आईबाबा झाले सर्वच परके

सासरच्या प्रेमाने जोपासते मी आठवणी


धाकधूक होती मनात, विचारांचे होते काहूर

मायेच्या ओलाव्यात रुजली तुळस अंगणी


हिरवा चुडा, कपाळी कुंकू लाल सौभाग्याचे

चंद्र तारे झाले साक्षी बनताना सवाशिण


सख्या संगतीने तुझ्या नवजीवनाची गोडी

तुझ्यासाठीच गाते अपुल्या प्रीतीची गाणी


सुखदुःखे दोन बाजू असे एका नाण्याची

आपुलकीने देऊ संसाराला नवी उभारणी


तू साद मी प्रतिसाद, तू ऊन तर मी छाया

जीवन ऋतूमधले पवित्र नक्षत्र जणू श्रावणी


संसारवेलीवर स्नेहा रुपी स्वर्णपुष्प बहरले

पारिजातकापरी दरवळे मधुगंध हा जीवनी


तुझ्यासंगे व्हावी पूर्ण आयुष्यातील स्वप्ने

गोजिरवाण्या प्रपंचाची मी सौभाग्यकांक्षिणी


माझे विश्वची बनले आता माझा हा संसार

अखेरपर्यंत राहील मी जशी चंद्रासंगे चांदणी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama