STORYMIRROR

Umesh Dhaske

Drama

3  

Umesh Dhaske

Drama

मी तीच वाट धरली..!

मी तीच वाट धरली..!

1 min
212

मी तीच वाट धरली जी

वळण दाखवते

खाचखळग्यांना दूर सारते

ओबडधोबड धोंड्यांनाही मार्गी लावते...!


मी तीच वाट धरली जी

नेमाने पुढे जाते

सन्मार्ग दाखवते

चालण्यास धावण्यास 

ऊर्जा अन् गती देते

अंधारला भेदून जाते....!


मी तिच वाट धरली जी

आयुष्य जगण्यास 

शिकवते

पाऊलांचा तोल सांभाळाया शिकवते

सावरते कधी, कधी

सोबतीला असते...!


मी तीच वाट धरली जी

ध्येयास जाऊनी

बिलगते

स्वप्नांना आत्मविश्वासाने

सजवते

घडवते

देण्यास शिकवते

घेण्यास शिकवते

बळ पायांतील बळकट 

बनवते

मी तीच वाट धरली...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama