मी निःशब्द होते
मी निःशब्द होते
कातरवेळ गहिरी अशी ती आठवांत भिजवते
मावळतीच्या त्या क्षणी मी निःशब्द होते.
नभातील गारव्याची लकेर अलवारं स्पर्शात भिजवते
शहारलेल्या त्या क्षणी मी निःशब्द होते.
तारका माळलेली रात्र लख्ख प्रकाशातं भिजवते
रूपेरी त्या क्षणी मी निःशब्द होते.
चंद्राची चकोर त्याच्या लोभस हास्यात भिजवते
धुंद त्या क्षणी मी निःशब्द होते.
उगवलेली प्रत्येक चांदरात शब्दांत चिंब भिजवते
लिहिताना त्या क्षणी मी निःशब्द होते.
