मी कवी
मी कवी
रांगडा खेळगडी मी
लेखणीने शब्दरूपी
खेळ मी खेळीत जातो
ना हरणायची पर्वा
मला मी माझ्यातच
धुंद होत असतो
लेखणीने मी
विश्वाची भ्रमंती
करीत जातो
कधी कधी मी
माझ्याच काव्यरूपी
तलवारीने सपासप
शत्रूला मारीत जातो
जिथे मानवी वस्ती
नाही तेथे वास्तव्य
करुनि रहातो
आभाळाला भेदणारी
गगन भरारी घेत जातो
कल्पनेच्या क्षितिजा
पलिकडेही भरधाव
मी घेत जातो
कल्पनेच्या भावविश्वातील
अकल्पित गर्भित अर्थ मी
शोधीत जातो
अकल्पित महासागराला
मी पार करुनि जातो
